Maharashtra Rain Update 5 Days : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात या भागात आज तूरळक ठिकाणी जोरदार पाऊस शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर बंगालच्या उपसागरात चक्रकार वारे असल्यामुळे पुढील ४८ तासात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो अंदाज वर्तवण्यात येते आहे. जर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर राज्यात पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची सुरुवात होईल. तसेच कोकण आणि गोव्यात तूरळक ठिकाणी मेगर्जनासह जोरदार पाऊस होईल आणि उर्वरित भागात हलका आणि मध्यम प्रकारचा पाऊस पडू शकतो.
India Meteorological Department | Maharashtra Rain Update 5 Days
पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात हवामान खात्याने पावसाचा इशारा जारी केला आहे. प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ४ सप्टेंबर रोजी धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. तसेच पुढील दोन दिवस धाराशिव, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात पावसाचा इशारा जारी केला आहे.
तसेच ७ सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली, या तीन जिल्ह्यात हवामान खात्याने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने धाराशिव तसेच लातूर, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, अमरावती, ठाणे, रायगड, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांना आज येलो अर्लट जारी करण्यात आला आहे.