Maharashtra Weather Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असल्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांत पुढील 2 तासात पाणीच पाणी होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याच प्रमाणे या आठवड्यात अनेक जिल्ह्यात पाणीच पाणी झाले आहे. हवामान खात्यानुसार राज्यातील चार भागात आज रात्री मुसळधार पाऊस पडणार आहे.
प्रादेशिक हवामान विभागनुसार पुढील २ तासात आज ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात धुवांधार पाऊस पडू शकतो. आज रात्री मुंबई शहरात पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईसह आज रात्रीसाठी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अर्लट जारी केला आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात मेघगर्जनासह या आठवड्यात पाऊस होत राहणार आहे. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतितीव्र मुसळधार पाऊस २७ जुलै पर्यंत पडणार आहे.
Osmanabad dist