Maharashtra High Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस होत असल्यामुळे शहर ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली. शहर ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मानवी जीवन हे विस्कळीत होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या हवामान अंदाजनुसार राज्यातील कोकण भागात 20 जुलै रोजी अति मुसळधार पाऊस पडल्याने शहर ठिकाणी पाणी साचले आहे. तसेच नदी नाले, बंधारे, शेततळे तुडूंब भरले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक भागात पुढील २४ तासात धोकादायक पाऊस पडू शकतो.
मागील काहि दिवसापासून राज्यातील काही भागात पावसाने उघडीप होती परंतू उर्वरित भागात भाग बदलत मुसळधार पाऊस पडत होता. सध्याच्या परिस्थितीत मॉन्सूनची प्रगती चांगल्याप्रकारे झाल्यामुळे राज्यातील कोकण भागातील अनेक जिल्ह्यात धोक्याचा पाऊस पडू शकतो.
तसेच पुढील काही तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, उत्तर विदर्भात आणि पूर्व विदर्भात हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. मुंबई आणि पुणे भागात आज 21 जुलै रोजी पावसाचा जोर वाढणार आहे.