Maharashtra Weather Forecast : 25 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार

Maharashtra Weather Forecast : 25 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार
Maharashtra Weather Forecast : 25 ऑगस्ट पासून पावसाचा जोर वाढणार

 

india meteorological department : आताच आलता, लगेच गेला, अशा प्रकारे महाराष्ट्रात पाऊस होत आहे. आज अहिल्यानगर ( अहमदनगर ) तालुका शेवगाव मध्ये २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी अनेक गावात मध्यम प्रकारचा पाऊस झाला आहे. परंतू महाराष्ट्रातील बहूतांश भागात तूरळक ठिकाणीच पाऊस होत आहे. जर पावसाळ्या सारखा पाऊस झालाच नाही तर शेतकऱ्यांना दोन संकटा समोर जावे लागणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या उभी राहिली तसेच सध्याच्या परिस्थितीत पाहले तर बहूतांश भागात पावसाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांचे पिके धोक्यात सापडणार आहेत.

आजचा हवामान अंदाज | India Meteorological Department

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुन्हा जोरदार पावसाची सुरुवात,  असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उद्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि गोवा मध्ये तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल परंतू अनेक बहूतांश भागात ढगाळ आणि मध्यम प्रकारचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यात २४ ऑगस्ट पर्यंत तूरळक ठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस होत राहिल परंतू मराठवाड्यात, विदर्भात तसेच कोकण भागात पुढील तीन दिवस हलका ते मध्यम प्रकारचा पाऊस होत राहणार आहे.

Maharashtra Weather Forecast : आज 15 जिल्ह्यात बहूतांश ठिकाणी पावसाचा इशारा

जुलै महिन्यात ज्या प्रकारे शेवटच्या आठवड्यात सर्वत्र मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती, त्याच प्रकारे ऑगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाची होण्याची शक्यता दाट आहे. भारतीय  हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसान राज्यात २२ ऑगस्ट पासून २४ ऑगस्ट पर्यंत हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. २५ ऑगस्ट पासून वातावरणात बदल होण्यास सुरुवात होईल तसेच पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यात ३० ऑगस्ट पर्यंत सर्वत्र पावसाचे आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Maharashtra Weather Forecast : आज 15 जिल्ह्यात बहूतांश ठिकाणी पावसाचा इशारा
Maharashtra Weather Forecast : आज 15 जिल्ह्यात बहूतांश ठिकाणी पावसाचा इशारा

Leave a Comment