MCX Cotton Rate Today : यावर्षी नवीन कापसाला वाढून भाव मिळणार !

MCX Cotton Rate Today : यावर्षी कापसाला सर्वाधिक भाव मिळण्याची शक्यता आहे. आताच्या परीस्थितीत शेतकरी कमी भावात कापूस देण्यास तयार होत नसल्याचे समोर येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत याही वर्षी कापसाचे उत्पादन भारतात कमी होण्याची शक्यता आहे. असा अंदाज जाणंकरांचा आहे. काही जाणंकरांच्या मते यावर्षी उत्पादन १२ टक्के वाढणार आहे कारण यावर्षी कापसाची लागवड सुध्दा मोठ्या प्रमाणात झाली आहे. 

MCX Cotton Rate Today
MCX Cotton Rate Today

यावर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यात अतिवृष्टी तसेच बोंड आळीचा प्रादभार्व पाहयला मिळाला आहे. यामुळे दर वर्षी शेतकऱ्यांचे मोठ‌्या प्रमाणात कापूस उत्पादन होत नाही. यावर्षी उत्पादनात वाढ झाली असली तरी कापसाच्या भावात फारसा फरक दिसणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत भारतीय कापसाला मागणी आहे. तसेच चीन, पाकिस्तान, बांग्लादेश असे इतर देशात पावसामुळे तेथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. म्हणूनच मागील वर्षी भारतीय कापसाला मागणी होती याही वर्षी नवीन कापसाला चांगलीच मागणी राहणार असल्याचे चित्र समोर येत आहे. भारतातील काही बाजार समिती मध्ये कापसाच्या भावात एक महिनाच चढ उतार पाहयला मिळेल पण पुढे चालून काही कापसाच्या भावात तेजी येईल असे जाणंकरांच मत आहे.

कापूस उद्योगात असणारे लोक म्हणतात की, शेतकऱ्यांनी मागील वर्षीप्रमाणे, कशाप्रकारे कापसाला भाव मिळाला तसेच किती आवक आली होती केव्हा व कोणत्या महिन्यात कापसाला चांगला भाव भेटला यावरुन शेतकऱ्यांनी अंदाज लावावा. किंवा शेतकऱ्यांनी बाजार समिती मधील बाजाराचा आढावा घेऊनच टप्याटप्याने कापूस विक्री करावा.

यावर्षी चीन कापसाची मागणी करेल का ? 

चीन मध्ये कोरोनामुळे तेथे व्यवसाय‍ ठप्प पडत आहे. चीन मध्ये अनेक प्रमुख शहरात लॉकडॉऊन लावल्यामुळे तेथील नागरीक आक्रमक झाले आहेत. यामुळे लोक तेथे आक्रमक आंदोलन करत असल्याचे चित्र समोर येत आहे. काही जाणंकरांच्या मते, चीन मधील परिस्थिती पाहता यावर्षी चीनकडून कापसाची मागणी कमीच राहू शकते.

Leave a Comment