
Monsoon 2023 : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे अनेक राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. आज पासून कोकण भागात तसेच मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. पूर्व विदर्भात आज १७ जुलै रोजी जोरदार पाऊस होणार तसेच उर्वरित विदर्भात आणि मराठवाड्यात सुध्दा जोरदार वाऱ्यासह भाग बदलत मुसळधार पाऊस पडू शकतो.
उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंड तसेच बंगालच्या उपसागरच्या भागात मॉन्सून सक्रीय आहे. तसेच महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस तसेच ढगाळ वातावरण पाहयला मिळणार आहे.
आज रात्री पाऊस पडणार का ?
पुणे भागात आज अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. तसेच नांदेड आणि विदर्भातील उर्वरित भागात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
