Monsoon 2023 : महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यात आज रात्री तूफान पाऊस होणार आहे. उर्वरित महाराष्ट्रात कश्याप्रकारे पाऊस असणार तसेच कुठे पाऊस पडणार या बाबत खाली सविस्तर वाचा
पुढील दोन दिवसात या जिल्ह्यात मुसळधार पाऊस | Monsoon 2023
मुंबई, पालघर, ठाणे या भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस होणार तसेच रायगड आणि पालघर मध्ये पुढील दोन दिवसासाठी ऑरेंज अर्लट देण्यात आहेत. कोकणात आज पावसाचा जोर वाढणार तसेच सिंधुदुर्ग मध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बीड उर्वरित जिल्ह्यांन मध्ये तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे, नाशिक, या भागात आज 28 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात अमरावती, नागपूर या जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस असणार तसेच उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांन मध्ये भाग बदलत मुसळधार होऊ शकतो.
भंडारा तसेच गोंदिया जिल्ह्यांन मध्ये आज भाग बदलत अतितीव्र पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते मध्य महाराष्ट्रात म्हणजे विदर्भातील काही भागात तसेच मराठवाड्यातील काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आपला बळीराजा WhatsApp Group वर जॉईन व्हा.
What’s about Kolhapur district?