Monsoon Rain : हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत राज्यात कसा पाऊस राहील याबाबत अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पुढील पाच दिवसांत राज्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागात मेघगर्जना सह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये मात्र ह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने केलेल्या आढावा नुसार पुणे, मुंबई (Mumbai), नाशिक (Nashik) आणि ठाणे (Thane) या शहरांमध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.