
Monsoon Update : जुलै महिन्यातील सुरुवातीच्या दोन आठवड्यात पावसाचा खंड नाही. मुंबई आणि पुणे या भागात चांगल्याप्रकारे पाऊस पडत आहे. परंतू उर्वरित भागात पावसाचा जोर वाढला नाही. राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस कसा पडेल याबाबत स्पष्टीकरण हवामान खात्याने दिले आहे.
२५ जून पासून मुंबई आणि पुणे भागात २ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे पुणे आणि मुंबई भागातील वाहूतिकवर परिणाम झाला आहे. मागील दोन ते तीन दिवस मुंबई आणि पुणे भागात पावसाने विश्रांती घेतली होती. परंतू भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढीत दोन ते तीन दिवस कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्रात भाग बदलत अति मुसळधार पाऊस पडणार आहे.
पुणे जिल्ह्यांत आज 7 जुलै रोजी हवामान खात्याने ऑरेंज अर्लट दिला आहे. आज घाट माथ्यावर तसेच रायगड आणि रत्नागिरी मध्ये अति मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात आणि मराठवाड्यात बहूतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच मुसळधार पावसाची हजेरी लागणार आहे.
हवामान अंदाज WhatsApp Group वर पाहत जा
