Monsoon Update : महाराष्ट्रातील या भागात तीन दिवस मुसळधार पाऊस

Monsoon Update : राज्यात १० जून पासून पावसाचे वातावरण तयार झाले होते. तेव्हा पासून आतापर्यंत भाग बदलत पाऊस होत आहे. हा पाऊस पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या तसेच लागवड खुळबल्या आहे. काही भागात पाऊस पुरेसा झाला आहे त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी पीकांची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी लागवडची घाई करु नये कारण जमीनीची ओल चांगल्याप्रकारे झाली नसली तर तुम्हांला पुन्हा पीकांची लागवड करण्याची वेळ येउ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जमीनीच ओल तपासूनच पीकांची लागवड करावी.

Monsoon Update
Monsoon Update


आताची शेतकऱ्यासाठी हवामान विभागाकडून ( Monsoon Update ) दिलासादायक बातमी समोर येत आहे तसेच सर्वसामान्य लोकांना सुध्दा उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. राज्यात शेतकरी पेरणी किंवा लागवडसाठी धावपळ करत आहे. पण या धावपळी मध्ये शेतकऱ्यांना नक्कीच असा प्रश्न पडतो क‍ि योग्य वेळी पाऊस पडेल का याची त्यांना चिंता असते. अशातच शेतकऱ्यांना हवामान विभागाकडून नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. 

भारतात मान्सूनचे आगमन झाले, पुढील पाच दिवस गोवा, केरळ आणि कर्नाटक या ठिकाणी मुसळधार पाउस असणार आहे. तसेच अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार आणि झारखंड या राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्यानुसार महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात भाग बदलत मुसळधार पाऊस होणार आहे. २५ जून ते २६ जून तारखांना मराठवाडा आणि विदर्भात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच २७ तारखेला विदर्भात मुसळधार पावसाची सुरूवात होणार आहे.   

Leave a Comment