Monsoon Update 2023 : राज्यात पाऊस कसा पडणार ?

Monsoon Update 2023 : राज्यात पाऊस कसा पडणार ?
Monsoon Update 2023 : राज्यात पाऊस कसा पडणार ?

 

Monsoon Update 2023 : IMD ने आज कोकण भागात रेड जारी अर्लट जारी केला आहे. तसेच राज्यातील अनेक भागात पेरणीसाठी आवश्यक पाऊस पडत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील बळीराजा चिंतेत आहे.

कोकण भागात मुसळधार पाऊस पडत असूनहि इतर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. हवामान विभागाच्या मते, राज्यातील एकाच भागात कमी वेळेत अधिक पाऊस पडत आहे. राज्यातील पुढील चार आठवड्यात कोकण भाग सोडत इतर भागात पाऊस कमी राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठाणे, रायगड, मुंबई, नाशिक, नंदुरबार, लातूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातील पावसाची नोंद झाली आहे. अकोला, हिंगोली, जालना, सांगली या जिल्ह्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. कोकण भागात महत्वाच्या परिसरात पावसाची मोठी तूर राहिली आहे. सिंधुदुर्गात सुध्दा पावसाची तूट असल्याची नोंद आहे.

पुढील चार आठवड्याचा हवामान अंदाज  ‌| Monsoon Update 2023

कोकण भागात : ८ जुलै पासून १३ जुलै पर्यंत, १४ जुलै ते २० जुलै पर्यंत, २१ जुलै ते २७ जुलै पर्यंत चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ : ८ जुलै पासून १३ जुलै पर्यंत बहूतांश ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे.

महाराष्ट्रात : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात १४ जुलै पासून २० जुलै पर्यंत बहूतांश ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असणार आहे. २१ जुलै ते २७ जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे पाऊस पडू शकतो. २८ जुलै पासून ३ ऑगस्‍ट पर्यंत कोकण पावसाचे प्रमाण चांगले राहिल तसेच राज्यातील उर्वरित भागात या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. भारतीय हवामान विभ‍ागाच्या मते, राज्यात २० जुलै पर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते तसेच पेरणी समस्या सुध्दा वाढण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज : WhatsApp Group वर तातडीने सामील व्हा.

Maharashtra Rain : या भागात पुढील 5 ते 6 सहा तासात मुसळधार पावसाचे आगमन होणार
Maharashtra Rain : या भागात पुढील 5 ते 6 सहा तासात मुसळधार पावसाचे आगमन होणार

Leave a Comment