Monsoon Update : मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली आहे. तसेच पुन्हा एकदा हवामान अंदाज जारी करत म्हटले की, पुढील काही दिवस राज्यात अशाच प्रकारे पाऊस पडणार आहे.
आज पाऊस पडणार आहे का ? | Monsoon Update 2023
पुणेसह मुंबई मध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस अनेक जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला तसेच झारखंड आणि ओडिशाच्या दिशेने वारे प्रवेश करत आहे. महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या किनार पट्टीवर द्रोणिय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच अरबी समुद्रात पुन्हा ईशान्य दिशेने चक्रीवात सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुंबई भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
पालघर, मुंबई, ठाणे या भागात मुसळधार पावसाची हजेरी आज ( 27 जून ) लागणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यात पुढील चार दिवस पाऊस पाहयला मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभाग तर्फे ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मध्य भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती असल्यामुळे आज तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. प्रादेशिक हवामान विभागनुसार राज्यात ३० जून पर्यंत हलका ते मुसळधार पाऊस होणार आहे.
रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group सामील होऊ शकतात.