Monsoon : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बहूतांश भागात २ जुलै पर्यंत प्रवेश केला आहे. आयएमडीच्या ( IMD ) माहितीनुसार राज्यात ८ जुलै पर्यंत संपूर्ण देशात मोसमी वाऱ्यांचा प्रवेश होईल. यापूर्वी अनेक भागात मोसमी वाऱ्यांनी प्रवेश केला असल्यामुळे बहूतांश भागात अनुकूल वातावरण तयार झाले आहे. अनुकूल वातावरण राज्यात तयार झाल्यामुळे पुढील पाच दिवस अनेक भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
२५ जून पासून ते २ जुलै पर्यंत राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली पण कोकण भागात तसेच पुणे, मुंबई या शहरात पावसाचा अधिक राहिला. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण पट्ट्यात तसेच पुणे, मुंबई, कोल्हापूर या भागात पुढील पाच दिवस मुसळधार राहणार आहे.
विदर्भात भाग बदलत तर मराठवाड्यात तूरळक ठिकाणी पुढील पाच दिवस पाऊस पडत राहणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील पुढील ६ जिल्ह्यात आज जोरदार पावसाची शक्यता आहे.