
Monsoon Rain : नैऋत्य मान्सूनच्या प्रवाहाचा वेग कायम आहे. रविवारी (ता. 9) मान्सूनचे वारे मुंबई, पुणे तसेच ठाणे, नगर, बीडच्या दिशेने सरकले आहेत.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मान्सून) प्रवाहाचा वेग कायम आहे. रविवारी (ता. 9) मान्सूनचे वारे मुंबई, पुणे तसेच ठाणे, नगर, बीडच्या दिशेने सरकले आहेत. मात्र, देशभरात मान्सूनची हालचाल ‘जैसे थे’ आहे.
महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मॉन्सून पुढे जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची प्रगती झपाट्याने होत आहे. मान्सून दोन दिवसांपूर्वी (३० मे) केरळमध्ये पोहोचला आणि चार दिवसांपूर्वी गुरुवारी (६ मे) महाराष्ट्रात पोहोचला.
शनिवारी (ता. 8) मान्सून पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांतील काही भागांत पोहोचला, तर रत्नागिरी, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांत तो दाखल झाला. रविवारी (ता. 9) मुंबईसह ठाणे, पुणे, नगर, बीड जिल्ह्यांतील बहुतांश भागात मान्सूनने आगेकूच केली.
मात्र, अरबी समुद्रातून वेगाने पुढे सरकणाऱ्या बंगालच्या उपसागरावरील मान्सूनची शाखा मंदावली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘रेमाल’ चक्रीवादळामुळे यावर्षी मान्सून सामान्य दीर्घकालीन वेळेच्या (३१ मे) सुमारे १० दिवस आधी सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागात पोहोचला.
मात्र, तेव्हापासून पूर्व भारतावर मान्सूनची प्रगती झाली नसल्याचे दिसून आले आहे. मान्सून हळूहळू उत्तरेकडे सरकणार आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
