
Monsoon Update Today : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र तसे विदर्भात मान्सूनने चांगल्या प्रकारे हजेरी लावली आहे. परंतू मराठवाड्यात आणि विदर्भात काही भागात चांगल्या प्रकारे पावसाने हजेरी न लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनहि खुळबंल्या आहेत.
राज्यात अजून पावसाची किती टक्के गरज ?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ८ जून पासून १ जुलै या कालावधीत राज्यातील अनेक भागात चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे. हवामान खात्याने माहितीनुसार राज्यातील एकाच भागात कमी वेळेत अधिक पाऊस पडल्यामुळे इतर भागात पावसाचे प्रमाण हे कमी राहिले आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रात, गोवात ३८ टक्के, मराठवाड्यात ६४ टक्के, विदर्भात ५६ टक्के या भागात पावसाची गरज आहे.
24 तासात या भागात जोरदार पावसाची सुरुवात | Monsoon Update Today
पूर्व विदर्भात किंवा कोकण भागात पुढील २४ तासात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार कोकण भागात आणि घाट क्षेत्रात पावसाचे प्रमाण हे पुढील काही दिवसात कमी होणार आहे. ठाणे, मुंबई, पुणे या भागात सुध्दा पुढील काही तासात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड, पालघर या भागात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अर्लट हवामान विभागाने दिला आहे. तसेच पुणे, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अर्लट जारी केला आहे.
WhatsApp Group : हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच जॉईन व्हा.
