Monsoon Update : राज्यात जून महिन्यात पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होऊनहि महाराष्ट्रात पावसाळ्या सारखा पाऊस झाला नाही. त्यानंतर अरबी समुद्रात बिपरजॉय या चक्रीवादळाने रौद्र रुप धारण केल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बाष्पभवन गुजरातकडे वाहून नेले तसेच महाराष्ट्रात मान्सूनची तीव्र गती कमी केली आहे.
जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पुन्हा मान्सूनचे चांगले आगमन झाले. जांणकरांच्या मते २५ जून पासून ते ३० जून पर्यंत कोकण पट्टीत चांगल्याप्रकारे पाऊस झाला पण मराठवाड्यात आणि विदर्भातील काही भागात अजूनहि चांगल्याप्रकारे पाऊस झालेला नाही. जून महिना संपला तरीहि चांगल्याप्रकारे पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात दुष्काळाची भिती निर्माण होत आहे.
आज कुठे पाऊस पडणार ?
प्रादेशिक हवामान विभागाच्या मते, ४ जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर,
सिंधुदुर्ग या जिल्ह्यात बहुतांश भागात भाग बदलत अति मुसळधार पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी रिमझिम किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोकण भागात पावसाचा जोर अधिक असणार तसेच मराठवाड्यात आणि विदर्भातील अर्ध्याहून अधिक भागात विखुरलेल्या पाऊस पडणार आहे.