Namo Shetkari Sanman Yojana : केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना राबवत आहेत. भारतात सर्वात प्रसिध्द योजना केंद्र सरकारची पीएम किसान योजना तर महाराष्ट्रात राज्य सरकारची योजना सुरु होण्याआधीच नमो शेतकरी योजना प्रसिध्द झाली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनसाठी सर्वात महत्वाची अपडेट राज्य सरकारनी दिली आहे. पुढे वाचा
नमो शेतकरीचे पैसे कधी जमा होणार ? | Namo Shetkari Sanman Yojana
महाराष्ट्राचे ( cm ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व खाली नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत होता तसेच ज्यांनी ईकेवायसी पूर्ण केली अशाच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. सर्वात महत्वाचे आतापर्यंत ७३ लाख शेतकऱ्यांनी हि प्रकिया पूर्ण केली असल्यामुळे नमो शेतकरी योजनेअंतर्गत त्यांना पैसे मिळतील.
१६ लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत ईकेवायसी पूर्ण न केल्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा पैसे जमा होणार नाही. फक्त सोलापूर जिल्ह्यात पीएम किसान योजनेअंतर्गत ५ लाख ४८ हजार ९६७ शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण न केल्यामुळे नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभ मिळणार नव्हता परंतू ई केवायसी बंधन कारक केल्यानंतर शेतकरी ई केवायसी पूर्ण करत आहेत.
आतापर्यंत सोलापूर मध्ये अर्धाहून अधिक शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली तसेच उर्वरित १ लाख १६ हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नाही. केंद्र सरकार आता शेतकऱ्यांना शेवटची मुदत देऊन ई केवायसी पूर्ण करण्यास संधी देणार जर हि संधी गमवून दिली तर अशा शेतकऱ्यांचे नाव योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे.
कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत २ हजार तर नमो शेतकरी योजनअंतर्गत २ हजार रुपये असे मिळून १ जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या ४००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.