New cotton arrival : नमस्कार शेतकरी मित्रानो, आता महाराष्ट्रसह इतर राज्यात कापसाची आवक येण्यास सुरुवात झाली आहे. पुढच्या महिन्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात आवक येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कापसाला भाव चांगल्या प्रकारे मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी कापूस लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली असून तरी सुध्दा नवीन कापसाचे भाव ( New cotton arrival ) घसरण्याची शक्यता कमी आहे.
New cotton arrival |
कापसाचे भाव २०२२-2023 मध्ये कसे असतील ?
शेतकरी मित्रानो महाराष्ट्रसह इतर राज्यात सुध्दा कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यावर्षी कापसाची लागवड ६.६५ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव वाढून आहेत. येणाऱ्या काळात सुध्दा नवीन कापसाचे भाव ( New cotton arrival ) वाढण्याची शक्यता आहे. दर वर्षी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. तसेच बोंड आळी आणि कीड रोगांचा प्रादर्भाव कापसाच्या झाडावर होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाचे नुकसान होत आहे. सतत पिकांचे नुकसान होत असल्यामुळे याही वर्षी कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. २०२२ – 2023 मध्ये कापूस लागवड वाढली तरी सुध्दा कापसाच्या भावावर परिणाम होणार नाही.
हरियाणा आणि पंजाब तसेच इतर राज्यात सुध्दा सप्टेबर पासून मोठ्या प्रमाणात नवीन कापसाची ( ‘New cotton arrival’ ) आवक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
५०० गांठी पेक्षा कमी कापसाची आवक सध्याच्या परिस्थित होत आहे.
नवीन कापसाला मागील वर्षी ५ हजार पेक्षा कमी भाव मिळत होता पण या वर्षी नवीन कापसाला भाव ( “New cotton arrival” ) ९ हजार ९०० ते १० हजार असा भाव सध्या मिळत आहे.
मागील वर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले त्यामुळे यावर्षी जिनिंग मिल्स नवीन कापसाची वाट पाहत आहे.
उत्पादनात घट दरात वाढ 2022
या आठवड्यात नवीन कापसाचे भाव ( New cotton arrival ) २१ टक्क्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढले आहे. अमेरिकामध्ये कापसाचा शिल्लक साठा घटलेला आहे. तसेच अमेरिकामध्ये या वर्षी कापसाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात १२४ लाख २७ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. तसेच सध्याच्या परिस्थित देशात पिकाचे नुकसान झालेले सांगितले जात आहे. देशात पिकाचे नुकसान किती झाले याबाबत १५ ते २० दिवसांनी स्पष्ट होईल. याही वर्षी उत्पादनात घट आणि भावात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केल आहे.