NEW UPDATE : शेतकऱ्यांनसाठी दमदार बातमी; राज्य सरकारकडून पहिला हप्ता पुढील महिन्यात येणार, २ हजार रुपये मिळवण्यासाठी आताच हे काम करा

Eknath shinde
Eknath shinde

 

NEW UPDATE : ९६ लाख शेतकऱ्यांना राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे मिळून वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दर चौथ्या महिन्यात २ हजार रुपायांचा हप्ता येत आहे. पण आता राज्य सरकार सुध्दा नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या दर चौथ्या महिन्यात २ हजार रुपायांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहेत.

केंद्र सरकारचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर १५ दिवसानंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपायांचा आणखीन एक हप्ता जमा करण्यात येईल. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मे महिन्यात पहिला हप्ता जमा करण्यात येणार असे सांगण्यात येत आहे.

केंद्र सरकार ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी तीन हप्ते जमा करतात त्याच प्रकारे राज्य सरकार पाठोपाठ तीन हप्ते जमा करणार आहेत. राज्य सरकारच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी महत्वाची अट, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. नोकरदार किंवा आयकर दाते, लोकप्रतिनिधीत्व यांना राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही.

महत्वाची सूचना ; जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात, अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.

९६ लाख शेतकऱ्यांच्या नावावर जमीन १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी असल्याचा दावा सरकारचा आहे. ९६ लाख पैकी १२ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही असेही समोर आले आहे. १२ शेतकऱ्यांनी पूर्ण पक्रिया केल्याशिवाय नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र सरकारचा १४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील महिन्यात दुसऱ्या किंवा तीसऱ्या आठवड्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे.

Onions Rate; महत्वाचे कांद्याच्या दरात होतेय मोठी घसरण, जाणून घ्या का होतेय घसरण ?

राज्य सरकारकडून २ हजार रुपायांचा हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसी, आधार बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार देण्यासाठी आरखाडा तयार करुन राज्य सरकारकडे सादर केला गेला आहे.

राज्य सरकारकडून हप्ता मिळवण्यासाठी महत्वाच्या अटी

  • प्रथम १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक
  • पीएम किसान योजनेअंतर्गत ई केवायसी पूर्ण करणे आवश्यक
  • शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक
  • लाभार्थींनी नोंदणी प्रक्रिया करणे आवश्यक

नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत लाभार्थी किती ?

  • सन्मान निधीसाठी ९५ लाख ८४ हजार शेतकरी पात्र
  • १२ लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • पूर्ण ई केवायसी प्रक्रिया करणारे शेतकरी ८२ लाख ९७ हजार आहेत.
  • वार्षिक हप्ते तीन असणार आहे.
  • राज्य सरकार कडून २ हजार रुपायचा हप्ता येणार आहे.
  • दर चौथ्या महिन्यात केंद्र सरकारचा हप्ता आल्यानंतर राज्य सरकारकडून हप्ता जमा करण्यात येणार आहे.

Farming Insurance : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 177 कोटी 80 लाख 61 हजार रुपायांचा निधी मंजूर, कोणत्या जिल्ह्यात किती निधी मंजूर ?

Leave a Comment