Onion Export To UAE : यूएईला अतिरिक्त 10 हजार टन कांद्याची निर्यात

Onion Export To UAE : यूएईला अतिरिक्त 10 हजार टन कांद्याची निर्यात
Onion Export To UAE : यूएईला अतिरिक्त 10 हजार टन कांद्याची निर्यात

 

Onion Export To UAE : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी असतानाही संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून अतिरिक्त 10,000 टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी, वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने 64,400 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती.

दरम्यान, देशातील कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ३१ मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवरील बंदी कायम राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परंतु लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर, वाणिज्य मंत्रालयाने 22 मार्च रोजी अधिसूचना जारी करून पुढील सूचना मिळेपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार असल्याची घोषणा केली.

अतिरिक्त कांदा निर्यात | Onion Export To UAE

वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी (03) कांदा निर्यातीबाबत अधिसूचना जारी केली. अतिरिक्त 10 हजार टन कांदा यूएईला निर्यात केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही निर्यात नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत केली जाईल, असेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

३ लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांच्या समितीने (१८ फेब्रुवारी २०२३) कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली होती. तसेच केंद्र सरकारने 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली.

कांदा निर्यात करण्यास परवानगी

वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, भारत सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत UAE आणि बांगलादेशला 64,400 टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. भूतानला 550 टन, बहरीनला 3000 टन, मॉरिशसला 1200 टन, बांगलादेशला 50,000 टन आणि UAEला 14,400 टन परवानगी देण्यात आली होती. आता अतिरिक्त 10,000 टन कांदा निर्यात केला जाईल.

5 लाख टन कांदा खरेदी करण्याच्या सूचना

तसेच, रब्बी हंगामातील कांद्याची टंचाई लक्षात घेऊन सरकारने NCCF आणि NAFED या सरकारी संस्थांना शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कांदा खरेदी करण्यासाठी दोन्ही एजन्सींना आधी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करावी लागणार आहे. कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Electricity Bill : वीज दरवाढीचा राज्यातील शेतकऱ्यांना 'धक्का'!
Electricity Bill : वीज दरवाढीचा राज्यातील शेतकऱ्यांना ‘धक्का’!

Leave a Comment