‍Onions : कांद्याचे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनकडे शेवटची तारीख

Onions : महाराष्ट्रातील लासलगाव बाजार समितीसह ( Market Committee ) इतर बाजार समिती मध्ये कांद्याची आवढ वाढत आहे.

Onions

Onions News : महाराष्ट्रातील शेतकरी आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका बाजून अवकाळी पावसाने नुकसान केले, तसेच दुसऱ्या बाजून कांद्याच्या भावात मोठी घसरण दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपला कांदा हा कवडीमोल भावाने विकाला लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत म्हणून प्रति क्विंटल मागे ३५० रु. अनुदान देण्याचे ठरवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी, आज ( 31 मार्च ) हि शेवटची तारीख आहे. गेल्या दोन लासलगाव बाजार समिती सह इतर बाजार समिती मध्ये कांद्याची आवक वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आज ज्या शेतकऱ्यांचा कांदा खेरदी केला जाईल अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

नाशिक बाजार समिती
मागील दोन ते तीन दिवसापासून नाशिक बाजार समिती मध्ये कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याचे भाव हे कमी होऊ नये अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे. पण बाजार समिती मध्ये आवक वाढल्यामुळे कांद्याच्या भावावर सुध्दा परिणाम पाहयला मिळत आहे. मागील आठवड्यात कांद्याला सरासर भाव ४०० ते ५०० नाशिक बाजार समिती मध्ये मिळत आहे.

कांद्याचे अनुदान मिळवण्यासाठी पक्रिया !

१ फेब्रुवारी पासून ३१ मार्च दरम्यान कांद्याला अनुदान
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून प्रति क्विंटल मागे ३५० रुपये अनुदान राज्य सरकार देणार आहे. प्रति शेतकऱ्याला राज्य सरकारने २०० क्विंटल पर्यंत मर्यादा ठेवली आहे. १ फेब्रुवारी पासून ते ३१ मार्च २०२३ दरम्यान शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी तारीख जारी केली होती. आज शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी शेवटची तारीख आहे. व अनुदानाचे पैसे हे पुढील महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात 30 दिवसात अनुदान जमा करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे.

प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदानाची मागणी
महाराष्ट्रात कांद्याच्या भावावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली तसेच यावरती राजकारण सुध्दा झाले आहे. विरोधी पक्षांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनसाठी प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदानाची मागणी केली होती. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनासाठी ३०० रुपये अनुदान जाहिर केले होते. पण विरोधकांनी मागणी लावून धरल्यामुळे राज्य सरकाने अनुदानात ५० रुपयाची वाढ केली आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना ३५० रुपये अनुदान मिळणार आहे.

Farming Insurance : शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या दरात मोठी सुधारणा !

Leave a Comment