Onions : फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिलेल्या माहिती नुसार, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदा चाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान राज्य सरकार देणार आहे.
दरवर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदा साठवण न केल्यामुळे ५० टक्के पेक्षा जास्त नुकसान होते. परंतु हे नुकसान टाळण्यासाठी सरकार सातत्याने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. खरीप हंगामात कांद्याची मागणी वाढते, तसेच निर्याती सुध्दा मोठ्या प्रमाणात होत असतात. कांद्याची साठवणूक शेतकऱ्यांन मध्ये वाढवावी तसेच ग्राहकांना योग्य दरात कांदा उपलब्ध व्हावा. कांद्याचे नुकसान टाळल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव मिळू शकतो.
कांदा चाळसाठी कुठे अर्ज करावे ?
ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ पाहिजे अशा शेतकऱ्यांनी www.hortnet.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
अशा प्रकारची माहितीसाठी तुम्ही आताच आमच्या आपला बळीराजा वेबसाइटवर जाऊन भेट देऊ शकतात.