Onions News In Maharashtra : मागील काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव संपूर्ण बंद आहे. नाशिक मध्ये कांदा प्रश्न निर्माण झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बाजार समितीचे प्रतिनिधी सोबत आज चर्चा केली आहे. यामुळे व्यापांनसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Weather : उद्याचे हवामान अंदाज | 3 दिवस पावसाचा इशारा
नाशिक मधील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या बुधवार पासून कांदा लिलाव बंद ठेवला आहे. गेल्या सात दिवसापासून कांदा लिलाव बंद असल्यामुळे कोटी पेक्षा अधिक नुकसान पाहयला मिळत आहे. व्यापाऱ्यांनी सात ते आठ प्रकारच्या मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. सर्वात महत्वाचे, कांदा निर्यात कर अधिक लावल्यामुळे शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत बैठक घेतली तसेच सात ते आठ मागण्यावर सविस्तर चर्चा होणार आहे.
मुंबईत मध्ये होणाऱ्या बैठकीत आज अब्दुल सत्तार, छगन भुजबळ, दादा भुसे असे इतर मंत्री सामील होणार आहेत. कांदा निर्यात वरील ४० टक्के शुल्क असलेले कमी करावे, कांद्याचे भाव नियत्रंणात ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना ५ टक्के पर्यंत सबसिडी मंजूर करावी तसेच वाहतुकीवर ५० टक्के पर्यंत सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी. असे इतर मागण्या राज्य सरकारकडे केल्या जात आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.