Panjab Dakh : भारतात अचूक हवामान अंदाज सांगणारे पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजनुसार राज्यात आज भाग बदलत अवकाळी पाऊस होणार आहे. आतूरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी, येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात मान्सूनचे आगमन होणार आहे. मान्सूनचे होण्यासाठी कमी कालावधी लागणार असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमीनीची मशागती करुन घ्यावी.
हवामान तज्ञ रामचंद्र साबळे
हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांच्या मते महाराष्ट्रात १० जून किंवा १२ जून पर्यंत मान्सूनची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, केरळ मध्ये मान्सूनचे चांगल्याप्रकारे आगमन झाल्यानंतर मान्सूनची प्रगती होऊन पुढील चार ते पाच दिवसानंतर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे.
हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांच्या मते, राज्यात यावर्षी पावसाचे प्रमाण हे नेहमी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जून व जुलै महिन्यात महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा खंड पाहयला मिळण्याची शक्यता आहे. तसेच मात्र विदर्भात १०० टक्के पावसाची हजेरी राहणार आहे.
पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh
पंजाब डख यांनी ३ जून रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनसाठी हवामान अंदाज जारी केला आहे. ८ जून पासून राज्यात मान्सूनचे आगमन होणार त्यांनतर अनेक जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाची सुरुवात होईल. ६ जून पर्यंत विविध भागात वीजासह जोरदार आणि मुसळधार पाऊस होणार आहे, यास आपण मान्सूनचा पाऊस समजू नये कारण हा अवकाळी पाऊस आहे.
पंजाब डख यांच्या मते, पूर्वेकडून यावर्षी मान्सूनचा पाऊस येणार आणि हा मान्सूनचा पाऊस चांगल्याप्रकारे असणार आहे. ८ तारखेला मान्सूनचे आगमन त्यांनतर राज्यात १८ जून पासून मान्सनची तीव्रात वाढेल आणि २३ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाची सुरुवात होईल. जून महिन्यात सर्व पेरण्या होतील असा अंदाज पंजाब डख सांगतात.
पैठण, जालना, बुलढाणा, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, बीड, बार्शी यावर्षी सर्वाधिक मान्सून पाऊस या जिल्ह्यात पाहयला मिळणार आहे.
पंजाब डख : आमचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.