Panjab Dakh : पंजाब डख यांच्या मते, यावर्षी राज्यात मान्सूनचा पाऊस हा कमी असणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तेथे बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या मान्सूनवर परिणाम झालेला आहे.
पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh Havaman Andaj Today
कोकण पट्टी, सातारा, कोल्हापूर, पुणे, जुन्नर, नाशिक, निफाड या भागात १५ जून पर्यंत भाग बदलत मान्सूनचा पाऊस पडणार तसेच महाराष्ट्रातील या भागाच्या पुढे मान्सून सरकणार नाही असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.
१६ आणि १७ तारखेला अरबी समुद्रातील बिपरजॉय हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर जाऊन धडकणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी दिली आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या जमिनीवर आल्यावर हे महाराष्ट्रातील बाष्पभवन ओढून नेणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सध्या मान्सूनची हजेरी पाहयला मिळणार आहे. सर्वदूर महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी पाहयला मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विचार करुनच पेरणीचा करावी.