Panjab Dakh : पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाज नुसार पंढरपूर भागात आज रात्री 29 रोजी पावसाचे आमन होणार. तसेच सोलापूर भागात २ जुलै पासून ते १० जुलै पर्यंत भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे.
आजचा हवामान अंदाज | Panjab Dakh
पंजाब डख हवामान अभ्यासक यांच्या मते, कोकण पट्टी, उत्तर महाराष्ट्रात या भागात आज पाऊस असणार आहे. मुंबई, नाशिक, पणे या जिल्ह्यातील भागात पावसाचा जोर अधिक पाहयला मिळणार आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात या भागात ३० जुलै १ जुलै रोजी भाग बदलत पाऊस पडणार तसेच कोकण पट्टी भागात पावसाचा जोर अधिकच राहणार आहे. कोकण पट्टी, उत्तर महाराष्ट्र, ( पुणे, सातारा, सांगली ) या भागात २९ जुन पासून १ जुलै पर्यंत अधिक पाऊस असणार तसेच पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात विखुरलेला पाऊस पाहयला मिळणार आहे.
राज्यात 15 जुलै पर्यंत पाऊस
पहिला व दुसऱ्या आठवड्यात पावसाचा खंड नसणार आहे. १५ जुलै पर्यंत पावसाचा खंड नसल्याने जवळपास महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या व लागवड पूर्ण होणार आहे. पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाड्यात २ जुलै पासून ८ जुलै पर्यंत खुप पाऊस असणार तसेच क्षिल्लक शेतकऱ्यांच्या ८ जुलै पर्यंत पेरणी नाही झाल्यास तर १५ जुलै पर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील.