Panjab Dakh : हवामान तज्ज्ञ पंजाब डख यांनी पुन्हा हवामान अंदाज जारी करत म्हटले की राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी १६ मे पर्यंत शेतातील सर्व कामे आटपून घ्यावे तसेच पिकांची जनावरांची सोय करावी. शेतकरी मित्रांनो, १६ मे पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडे हवामान तसेच ऊन्हाचा तापमान आणि जोरदार वारे वाहणार आहे. तसेच १७ तारखेपासून राज्यातील अनेक भागात वातावरण बदल झालेला पाहयला मिळेल.
Panjab Dakh : आजचा हवामान अंदाज
राज्यात १७ मे, १८ मे, १९ मे दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच २१ तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पंजाब डख यांच्या मते, यावर्षी मान्सूनची सुरुवात ७ जून पासून होईल आणि २२ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहचेल.
पंजाब डख : हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या Whatsapp Group वर सामील होऊ शकता.