Panjab Dakh : पंजाब डख यांनी मागील काही दिवसापूर्वी एक नवीन हवामान अंदाज जारी करत म्हटले होते की, राज्यात १५ जुलै पर्यंत मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात तसेच कोकणात विविध भागात पाऊस पडेल असे नमूद केले होते.
महाराष्ट्रात १२ जुलै पासून वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी पावसाचे आगमन झाले नाही अशा ठिकाणी पावसाचे आगमन होईल असे पंजाब डख यांनी नमूद केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनहि झाल्या नाहीत अश्या शेतकऱ्यांच्या पेरण्या सुध्दा याच दरम्यान होऊ शकतात. हा तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार पण उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेला पाऊस होणार असे हि म्हटले होते.
मागील दिलेला अंदाज पंजाब डख यांचा खरा ठरत आहे. महाराष्ट्रात तूरळक ठिकाणीच चांगला पाऊस झाला आणि उर्वरित महाराष्ट्रात भाग बदलत विखुरलेला पाऊस झाला आहे. परंतू महाराष्ट्रातील अनेक गावात पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांनवर अजूनहि संकट कायम आहे. तूरळक भागात पहिल्या पावसावर पेरणी केल्यामुळे शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. जुलै २०२३ महिन्यातील पहिल्या आठवड्यात चांगल्याप्रकारे पाऊस झाला परंतू दुसऱ्या आठवड्यात पावसाची तीव्रता कमी झालेली आहे. परंतू अश्यातच पंजाब डख यांनी पुन्हा एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.
पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh
पंजाब डख यांच्या मते, १९ जुलै ते २६ जुलै दरम्यान राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात या भागात चांगल्याप्रकारे पाऊस पडेल, या पावसात नदी, ओढे, बंधारे भरतील. पश्चिम महाराष्ट्रात आणि जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. असेही पंजाब डख यांनी हवामान अंदाज मध्ये म्हटले आहे.