Panjab Dakh | 25 जून पासून जोरदार मान्सूनचे आगमन | पंजाब डख हवामान अंदाज

Panjab Dakh | 25 जून पासून जोरदार मान्सूनचे आगमन | पंजाब डख हवामान अंदाज
Panjab Dakh | 25 जून पासून जोरदार मान्सूनचे आगमन | पंजाब डख हवामान अंदाज

 

Panjab Dakh : पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज १६ जून रोजी जारी केला आहे. पंजाब डख यांच्या मते, राज्यात २५ जून पासून विविध भागात मान्सूनचा पाऊस पडणार आहे. मागील हवामान अंदाज बदल म्हटले की, मान्सूनचे आगमन आधीच झाले होते परंतू ऐनवेळी चक्रीवादळाने सर्व बाष्पभवन गुजरात कडे वाहून नेले, त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा १५ दिवसांनी मान्सून लांबणीवर आला आहे.

Panjab Dakh | पंजाब डख हवामान अंदाज | Havaman andaj Today

मान्सून आगमन यावर्षी उशीरा झाले आहे. ८ जून ते ९ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले पण सर्वदूर मान्सूनचे आगमन झाले नव्हते. महत्वाचे म्हणजे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे तेथे चक्रीवादळ तयार झाले आणि चक्रीवादळाची गती वाढल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बाष्पभवन वाहून नेले यामुळे महाराष्ट्रात फक्त जोरदार वारे वाहले.

१६ जून रोजी पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज जारी करत म्हटले की राज्यात २५ जून पासून मान्सूनची गती हि तीव्र होणार तसेच २६ जून, २७ जून, २८ जून रोजी महाराष्ट्रात विविध भागात पेरणी इतका पाऊस होणार आहे. १० जुलैते १५ जुलैपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहे. पंजाब डख यांच्या मते २५ जून ते १५ जुलै पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस हा चांगल्या प्रकारे होणार आहे.

पंजाब डख यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Farming Insurance : 27 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
Farming Insurance : 27 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार

Leave a Comment