
Panjab Dakh Live : मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात पूर्वेकडून येत असल्यामुळे हा वेळेत दाखल होईल. पंजाब डख याच्या मते, राज्यात ८ जून पर्यंत मान्सून सक्रीय होईल. पुढील ४ ते ५ दिवसात राज्यात मान्सूनची गती तीव्र वाढेल. २० ते २२ तारखेपर्यंत राज्यात पूर्णपणे मान्सून सक्रीय होईल.
पंजाब डख यांची हवामान विभागावर टीका | Panjab Dakh Live
पंजाब डख हे नेहमी खरा अंदाज ठरत असतो. तसेच हवामान विभाग पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा विश्वास पंजाब डख यांच्या वर आहे. एल निनोमुळे महाराष्ट्रात मान्सून हा उशीरा येईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला परंतु या उलट पंजाब डख यांच्या मते यावर्षी वेळेवर मान्सून दाख होईल असा अंदाज व्यक्त केला. दरवेळा प्रमाणे पंजाब डख आणि हवामान विभागाचा अंदाज हा वेगळा पाहयला मिळाला आहे.
पंजाब डख असे म्हणतात की, मी शेतकऱ्यांच्या हितासाठी हवामानाचा अभ्यास करत असतो. त्यामुळे मला सतत पावसाचे ढग पाहयला मिळतात पण तेच ढग इतरांना दिसत नाही. अशी अप्रत्यक्ष टिका पंजाब डख यांनी हवामान विभागावर केली आहे. हवामान विभाग संस्थानी एकत्र येऊन अचूक अंदाज काढण्याची काळाची गरज आहे असे हि पंजाब डख म्हटले आहे.
हवामान विभागाचा अंदाज
एल निनोमुळे राज्यात मान्सून हा उशीरा येईल असा व्यक्त केला, त्यामुळे शेतकऱ्यांन मध्ये चिंताचे वातावरण वाढत गेले आहे. तसेच पंजाब डख यांच्या मते, राज्यात ८ जून पासूनच मान्सून सक्रीय होईल.
