Panjab Dakh Today : मंगळवार पासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात महत्वाच्या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात अजूनहि काही ठिकाणी पेरण्या योग्य पाऊस झाला नसल्याने, शेतकरी जोरदार पावसाची आतुरतेने प्रतिक्षा करत आहे.
जून महिन्यातील पहिल्या आठवाड्यात बहूतांश ठिकाणी पाऊस पडला त्यानंतर १५ ते २० दिवस राज्यात पावसाचा खंड पडला होता. परंतू २१ जून पासून राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले, त्यांनतर राज्यात २५ जून पासून पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाली होती. परंतू २५ जून पासून ते २ जुलै पर्यंत राज्यातील विविध भागात पाऊस पडला नाही.
३ जुलै रोजी राज्यातील विविध भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले व ५ जुलै रोजी परभणी, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तसेच अहमदनगर व नाशिक मध्ये पुढील २४ तासात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे.
पंजाब डख यांच्या मते, जुलै महिन्यात चांगल्या प्रकारे पाऊस पडणार, तसेच सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या जुलै महिन्यातच पुर्ण होतील. जुलै पासून ते ऑक्टोबर पर्यंत राज्यात दमदार पावसाची हजेरी राहणार आहे.
राज्यात ८ जुलै पर्यंत विविध भागात पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात होणार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात १३ जुलै पासून ते १७ जुलै पर्यंत राज्यात जोरदार पावसाची हजेरी लागणार आहे.
पंजाब डख : मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात पडणार तसेच उर्वरित भागात सुध्दा पावसाचे आगमन होणार आहे.