PM Kisan E-KYC : पी. एम. किसान योजनेअंतर्गत मोठी अपडेट

PM Kisan E-KYC : पी. एम. किसान योजनेअंतर्गत मोठी अपडेट
PM Kisan E-KYC : पी. एम. किसान योजनेअंतर्गत मोठी अपडेट

 

PM Kisan E-KYC : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने ई केवायसी पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारीकडून मिळत आहे. जो पर्यंत लाभार्थी शेतकरी ई केवायसी पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात १४ वा हप्ता पाठवण्यात येणार नाही.

तात्काळ ई केवायसी पूर्ण केल्यानंतर १४ वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही. तसेच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत ई केवायसी पूर्ण करणे बंधनकारक केंद्र सरकारने केले आहे. आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ८५ टक्के ई केवायसी पूर्ण केली आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत २००० रुपये तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत २००० रुपये असे मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार महिन्यातून एकदा ४००० रुपये मिळणार आहे.

पीएम किसान योजनेअंर्गत 14 वा हप्ता कधी मिळणार ?
केंद्र सरकारने पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनच्या खात्यात १४ वा हप्ता कधी येणार याबाबत कोणतेहि विधान किंवा माहिती दिली नाही. तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळवण्यासाठी सर्वात आधी पीएम किसान योजनेअंतर्गत १४ वा हप्ता आला पाहिजे.

शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : पीएम किसान ॲप वर किंवा PM kisan अधिकृत वेबसाइटवर जाऊन शेतकऱ्यांनी ई केवायसी सोप्या पध्दतीने करुन शकतात.

आपला बळीराजा : शेती विषयी अपडेट WhatsApp Group वर मिळवा

IMD : कोकण भागात पुढील आठवड्यात 9 जिल्ह्यात जोरदार पाऊस
IMD : कोकण भागात पुढील आठवड्यात 9 जिल्ह्यात जोरदार पाऊस

Leave a Comment