Pm kisan kyc update in marathi 2022 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पीएम किसान वेबसाइटवर केवाशी बदल मोठी अपडेट समोर आली आहे. पीएम किसान समान निधी योजना शेतकऱ्यांना लाभ दायक आहे. जे शेतकरी Pm kisan samman nidhi yojna चा फायदा घेतात त्यांच्या साठी महत्त्वाची अपडेट आहे. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना 10 वा हप्ता आला असेल तर त्यांना 11 वा हप्ता मिळवण्यासाठी kyc करण्याची गरज आहे. जर तुम्ही केवाशी नाही केल्यास 11 वा हप्ता येण्यास अडचण निर्माण होऊ शकते. केवाशी कशी करावी लागते हेही सविस्तर पुढे लिहिले आहे त्या आगोदर हा लेख शेतकऱ्यांना शेयर करायला विसरू नका.
Pm kisan kyc update in marathi 2022 |
पीएम किसान केवाशी 2022
Pm kisan samman nidhi ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे. पीएम किसान समान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षात 3 हप्ते भेटतात. प्रत्येकी तीन महिन्यानंतर एक हप्ता 2000 रु. मिळतो. आतापर्यंत देशामध्ये 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तसेच 11 वा हप्ता केव्हा मिळेल याची वाट शेतकरी पाहत आहे. 11 वा हप्ता मिळवण्यासाठी केवाशी करावी.
पीएम किसान समान निधी योजनांची केवाशी अशी करा
1) kyc 2022 आता ( CSC ) काॅमन सर्विस सेंटर येथे जाऊन सुध्दा तुम्ही केवाशी पूर्ण करु शकतात.
2) काॅमन सर्विस सेंटर मध्ये जात असाल तर तुमच्या सोबत आधार कार्ड पाहिजे.
3) महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड अपडेट पाहिजे.
4) आधार कार्ड वर तुमचा फोन नंबर, संपूर्ण नाव, संपूर्ण जन्म तारीख, तसेच पत्ता असणे गरजेचे आहे.
5) सर्वात प्रथम Pm kisan samman nidhi वेबसाइटवर भेट द्या.
6) E kyc असे नाव उजव्या बाजूला दिसेल त्यावर क्लिक करावे.
7) सर्वात आधी तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल त्याठिकाणी आधार नंबर टाका नंतर तुम्हाला कॅप्चा भरावा लागतो.
8) वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला फोन नंबर टाकून ओटीपी ( OTP ) मिळाले.
9) तोच ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर पडताळणी पूर्ण होईल.
Pm kisan kyc 2022 शेवटची तारीख
केंद्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत केवाशी पूर्ण करण्यासाठी मुदत दिली होती. काही तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांची केवाशी पूर्ण झाली नाही. त्यामुळे केंद्र सरकारने kyc पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. 22 मे 2022 पर्यंत केंद्र सरकारने kyc पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे.
ही माहिती महत्त्वाची वाटली तर हा लेख शेतकऱ्यांना शेयर करा.