PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेअंतर्गत १४ हप्ता खात्यावर कधी जाम होईल, यांची प्रतिक्षा शेतकरी वर्ग पाहत आहे. या योजनेअंतर्गत ११ करोडो शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे.
PM Kisan Yojana योजनेअंतर्गत किती शेतकऱ्यांना फायदा मिळणार ?
पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार देशाअंतर्गत १३ वा हप्ता ११ करोड शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात १४ हप्ता जमा करण्यात येणार आहे.
पीआयबीने ट्वीटर द्वारे दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना आर्थिक मदत तसेच बळकट बनवण्यासाठी पीएक किसान योजनेअंतर्गत चार महिन्यानंतर २ हजार रुपायांचा हप्ता वर्षातून तीन वेळेस दिला जातो. वर्षातून तब्बल शेतकऱ्यांना ६ हजार रुपये केद्र सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता दिला जातो. आतापर्यंत ११ करोड शेतकऱ्यांना तब्बल २.४२ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली नसेल तर त्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपायांचा हप्ता देण्यात येणार नाही. १४ वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. पीएम किसान च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करुन घ्यावी.