PM Kusum Schemes : पीएम कुसूम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 60 टक्के अनुदान कसे मिळणार या बाबात आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत.
सरकार शेतकऱ्यांनसाठी नवनवीन योजना राबवत असतात. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा व्हावी तसेच आर्थिक उत्पादन चांगले निघावे आणि शेती करताना गती मिळावी हा उद्देश सरकारचा असतो. उदा. कृषी यंत्रावर सब्सिडी, खतावर सब्सिडी इतर.
इलेक्ट्रिक ट्यूबवेलचा शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी याचा वापर करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक पैसे मोजावे लागतात. शेतकरी आता इलेक्ट्रिक ट्यूबवेल वर आधारीत राहू नये, यासाठी सरकारने पीएम कुसूम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पॅनेल देण्याचे ठरवले आहे. पीएम कुसूम योजनेअंतर्गत शेतकरी आता आर्थिक बचत करु शकतात. शेतकरी आपल्या शेतात सौर पॅनेल लावून, सरकारकडून आर्थिक मदत मिळू शकतात.
सौर पॅनेलसाठी ६० टक्के सब्सिडी कशी मिळणार ?
सरकार कुसूम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदान पहिल्यापासून देत आहे. तसेच तुम्ही बॅंकेकडून तुम्ही ३० टक्के कर्ज घेऊन आपल्या शेताता सौर पॅनेलची सुविधा करु शकतात.
सौर पॅनेलसाठी अर्ज कुठे करायचा ?
www.india.gov.in या सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन सौर पॅनेलसाठी अर्ज करु शकतात. यासाठी तुम्हाला एक घोषणा पत्र, जमिनीचे कागद पत्रे, आधार कार्ड, बँक खात्याचे कागद पत्रे असे इत्यादी कागद पत्रे लागणार आहे.
Saving Schemes : पाच वर्षात कमवाल तब्बल 25 लाख रुपये, शेतकऱ्यांनसाठी जबरदस्त योजना