PM Kisan Samman Nidhi Update : पंतप्रधान मोदींनी रविवारी (09) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यानंतर मोदींनी सत्ता हाती घेताच पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत निर्णय घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केली असून रविवारी (09) त्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी सोमवारी (10) दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत पहिला निर्णय घेतला. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता मोदींनी जारी केला.
देशातील करोडो शेतकऱ्यांना समोर ठेवून मोदी सरकारने पहिला निर्णय घेतला. मोदींनी 17 व्या हप्त्यासाठी 20 हजार कोटी रुपये जारी केले. यावेळी मोदी म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू.
आत्तापर्यंत केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे 16 हप्ते शेतकऱ्यांना दिले आहेत. शेतकरी 17 व्या हप्त्याची वाट पाहत होते. ही प्रतीक्षा आता संपली असून मोदींनी सोमवारी ती जाहीर केली. आता ९.३ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
भारत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी विविध योजना राबवल्या आहेत. यापैकी एक म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.
पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये मिळतात. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वार्षिक ६,००० रुपये मिळतात. ही रक्कम दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.