PM Surya Ghar Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला सौरऊर्जेत स्वावलंबी बनवण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी टपाल विभागाकडे देण्यात आली आहे. ताज्या माहितीनुसार 27 फेब्रुवारीपासून याची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 7500 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
प्रधानमंत्री सूर्य घर योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेच्या माध्यमातून एक कोटी कुटुंबांना सवलतीच्या दरात सौर पॅनेल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टपाल विभागाचे कर्मचारी गावोगावी जाऊन नोंदणी करून या योजनेची माहिती देत आहेत.
पोस्टमनही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. त्यामुळे या योजनेबाबत टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणात मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व नांदेड विभाग पोस्ट ऑफिसचे अधीक्षक राजीव पालेकर यांनी केले आहे. जिल्ह्यात एक मुख्य पोस्ट ऑफिस, 53 उप पोस्ट ऑफिस,
या सर्वेक्षणासाठी 436 शाखा पोस्ट ऑफिस, 775 पोस्टमन यांच्यासह 915 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत सर्वेक्षण सुरू आहे.