POCRA : सर्वांगणी विकास हेच महाराष्ट्र सरकारचे ध्येय असून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत म्हणजे पोकरा योजनेअंतर्गत ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले होते. खेड्या गावात तसेच वस्ती मध्ये आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी हि योजना राबवली जाते. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत ६ लाख ६५ हजार ४६२ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. पण पोकरा योजनेअंतर्गत मराठवड्यातील अडीज हजार गाव नेमणूक करुन यासाठी १९६३ कोटी ८३ लाख अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
POCRA Subsidy
पोकरा योजनेअंतर्गत वेगवगळ्या प्रकल्पासाठी १६ लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्त झाले होते. योजनेअंतर्गत २ हजार ६२७ गावे मराठवाड्यातील निवडण्यात आले तसेच ६ लाख ६५ हजार ४६२ शेतकऱ्यांची नोंदणी सुध्दा पूर्ण झाली आहे. १९६३ कोटी ८३ लाख रुपये, ३ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना फळबागांसाठी, अवजारे आणि योजनासाठी तसेच विविध योजने अंतर्गत हा निधी देण्यात आला आहे. वरील माहिती कृषी विभागकडून मिळाली आहे.
शेती विषयी तसेच योजने बाबत किंवा बाजार भाव पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group सामील होऊ शकतात.
Pocra madhil barech anudan pending aahet