Weather Update Today: हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा पश्चिम हिमालयीन भागावर परिणाम होऊ शकतो. त्याच्या प्रभावामुळे 11 राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
IMD Rain Forecast Today
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. पुढील तीन दिवस काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
कोणकोणत्या राज्यांना पावसाचा इशारा?
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत देशातील हवामानात अनेक बदल पाहायला मिळतील. पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम पाऊस, ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये कोरडे हवामान आणि देशाच्या विविध भागात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
16-17 जानेवारी रोजी पश्चिम हिमालयातील जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच पुराची शक्यता नाकारता येत नाही. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
ईशान्य बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे. शिवाय, रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते.
महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 19 जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट येऊ शकते, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, मराठवाड्यासह विदर्भात थंडीचा प्रभाव जाणवणार आहे. मध्य प्रदेशातून येणारे थंड वारे याला कारणीभूत आहेत.