Rain Alert Today : राज्यातील अनेक भागातील जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस असला तरीही उर्वरित भागात पावसाने दडी मारली होती. परंतूर आताच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासात ९ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याच अंदाज वर्तवला आहे.
पुढील 3 ते 4 तासात 9 जिल्ह्यात | Rain Alert Today
अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर हा कमी झालेला आहे. परंतू भारतीय हवामान विभागाने हवामान अंदाजनुसार राज्यातील पुर्व विदर्भात आणि उत्तर विदर्भात आज पावसासाठी पोषक वातावरण तयार आहे. पुढील १ ते २ तासात पाणीच पाणी होणार आहे.
जळगाव आणि धुळे या जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासात हलका ते मुसळधार पाऊस होणार आहे. अनेक ठिकाणी वीजासह जोरदार वारे असणार त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊनच बाहेर पडा. भारतीय हवामान खात्यानुसार, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तीव्र पावसाची शक्यता, तसेच रत्नागिरी, पालघर, रायगड, कोल्हापूर, नाशिक या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस असणार तसेच तूरळक ठिकाणी अति तीव्र पावसाची शक्यता आहे.
आजचा हवामान अंदाज
अहमदनगर, रत्नागिरी, पुणे, ठाणे, मुंबई, सातारा, सांगली, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, सोलापूर, हिंगोली, बुलढाणा, वर्धा, अमरावती, अकोला, नागपूर या जिल्ह्यात तूरळक ठिकाणीच मुसळधार पाऊस होईल परंतू बहूंताश भागात १४ जुलै रोजी साधारण पाऊस होणार आहे.
सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जालना, जळगाव, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागाने १४ जुलै रोजी पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. १७ जुलै पासून २२ जुलै पर्यंत पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण असणार आहे.