Rain Forecast : विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू राहील. वेगवेगळ्या ठिकाणी गारपीटही होत आहे. आज (दि. 13) हवामान खात्याने विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) जारी केला आहे. राज्यात कडक उन्हाचा कडाका कमी झाला आहे. मात्र, उकाडा कायम असल्याचे चित्र आहे.
सौराष्ट्र आणि परिसरात चक्री वाऱ्याची स्थिती कायम आहे. तेथून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुरुवारी (ता. 11) सायंकाळी सोलापूर, परभणी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. वेगवेगळ्या ठिकाणी गारपीटही झाली.
विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण आहे. राज्याच्या कमाल तापमानात घसरण सुरूच आहे. राज्यातील कमाल तापमान 40 अंशांच्या खाली गेले आहे. शुक्रवारी (ता. 12) सकाळपर्यंतच्या 24 तासांत मालेगावमध्ये राज्यातील सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (दि. 13) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा (पिवळा इशारा) जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्याच्या इतर भागात ढगाळ आकाशासह ऊन कायम राहण्याचा अंदाज आहे.
आजचा हवामान अंदाज | Rain Forecast
सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.