राज्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस
आज महाराष्ट्राच्या अनेक भागात हलका पाऊस झाला. त्यामुळे वातावरणातील आर्द्रता कमी झाली आहे. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
जळगाव आणि नगर जिल्ह्यात आज आणि उद्याही पाऊस
आज जळगाव आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात. उद्या दोन्ही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारी आणि सोमवारीही नगर जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्याच्या इतर भागातही पावसाची शक्यता आहे
रायगड जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी हलका पाऊस पडेल. रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवस हलका पाऊस पडेल. शनिवारी आणि सोमवारी धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. नाशिक जिल्ह्यात शनिवार, रविवार आणि सोमवार आणि पुणे जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी, तर कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सातारा आणि सांगली जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. जालना, धाराशिव, अमरावती, बीड जिल्ह्यात आज आणि उद्या बुलडाणा, अकोला जिल्ह्याच्या काही भागात हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.