Solar pump : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नंरेद्र मोदी किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना ( new scheme ) महराष्ट्रात राबवत असतात. या योजनेपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नक्कीच लाभ मिळतो. पण आता पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियानासाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियानासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाऊर्जाला १५ कोटी २७ लाख ५४ हजार रुपये देण्यास निधी मंजूर केला आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
महत्वाचे म्हणजे पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा या योजनेचे मुख्य कारण म्हणजे ज्या ठिकाणी वीज पुरवठा झालेला नाही. अशाच ठिकाणी सौर ऊर्जाव्दारे वीज निर्माण करुन कृषी पंपाना वीज पुरवठा करता येतो.
महाराष्ट्रात १ लाखा पेक्षा जास्त कृषी सौर पंप ( agriculture solar pump ) बसविण्याचे काम राज्य सरकार करणार आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पुरवठा झालेला नाही अशा शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एचपी अशा क्षमतेचे सौर कृषी पंपासाठी सौर ऊर्जा वीज जोडणीचे काम राज्य सरकार करणार आहे.
शेतकऱ्यांना इतके टक्के अनुदान
खुल्या प्रवर्गातील = ९० टक्के अनुदान
अनुसूचित जाती आणि जमाती = ९५ टक्के अनुदान