Soybean : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत यावर्षी सोयाबीनची मागणी राहण्याची शक्यता आहे. अर्जेंटीना या देशात सोयाबीन पिकांची शेती सर्वात जास्त घेतली जाते तसेच आंतरराष्ट्रीय पातळी वर सुध्दा सोयापेंड आणि सोयातेलाची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. पण यावर्षी अर्जेंटीना मध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
soybean |
अर्जेंटीना मध्ये दुष्काळ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर परिणाम झाल्याने सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात मोठी तेजी आली आहे.
सोयाबीनचे भाव वाढणार २०२३ ( Soybean )
अर्जेंटीना देश हा जगात सोयाबीन पिक घेण्यास तिसऱ्या क्रमांकवर येतो. या देशात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पिक घेत असल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन सुध्दा चांगल्याप्रकारे होते. त्यामुळे अर्जेंटीना हा देश जगात सोयापेंड आणि सोया तेलाची निर्यात मोठ्या प्रमाणात करतो.
मिळालेल्या माहिती नुसार, यावर्षी अर्जेंटीना मध्ये पावसाचे आगमन अवेळी झाल्याने सोयाबीन लागवड सुध्दा उशीरा झाली आहे. तसेच जाणंकरांच्या मते अर्जेंटीना मध्ये दु्ष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने सोयाबीन पिकांना सुध्दा फटका बसत आहे. अर्जेंटीना मध्ये सोयाबीन उत्पादनात मोठी घट पाहयला मिळेल तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीन भाव वाढणार.
अर्जेंटीना मध्ये सोयाबीनचे उत्पादन
बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात चढ ( Soybean Rate ) उतार चालू आहे. दुसरी कडे ज्या देशात सोयाबीनचे उत्पादन दर वर्षी सर्वात जास्त होत असते त्याच देशात दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत सोयातेल आणि सोयापेंडची मागणी व दरही वाढले आहेत.
अर्जेंटीना मध्ये सोयाबीनची लागवड होण्याआधीच युएसडीएने सोयाबीन उत्पादनाच पहिला अंदाज ५१० लाख टनाचा सांगितला होता. सोयाबीन लागवड होताच दुष्काळ सारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर युएसडीने सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या अंदाज मध्ये घट केली आहे. युएसडीच्या मते, दुसऱ्या अंदाज मध्ये यावर्षी ४५५ लाख टन सोयाबीनचे उत्पादन ( Production of soybeans ) होईल.
अर्जेंटीना मध्ये पावसासाठी पोषक वातावरण
दोन दिवसापासून अर्जेंटीनात काही भागात पाऊस ( rain ) होत आहे. पण जाणंकरांच्य मते पाऊस हा पुरेशा नसून सोयाबीन पिकांना जास्त फायदा मिळणार नाही. तसेच सगळ्या भागात हा पाऊस होत नसल्याने सोयाबीन उत्पादनात वाढ होऊ शकत नाही.