soybean seeds rate 2022 : महाबीज कंपनीने सोयाबीन बियाणे दुप्पट महाग केले

soybean seeds rate 2022 : नमस्कार शेतकरी मित्रानो यावर्षी सोयाबीन बियांणे विकत घेताना आणखी काही पैसे मोजावे लागणार आहे. महाबीजकडून मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी सोयाबीन बियांणे ( soybean seeds rate 2022 ) महाग केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा चांगलाच खर्च वाढत आहे.

सोयाबीन बियांणे दुप्पट महाग का ?

महाबीज शेतकऱ्यांना दर वर्षी जवळपास ३ लाख ते ३ लाख ५० हजार क्विंटल पर्यंत सोयाबीन बियांणे पुरवठा करत आहे. मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी का सोयाबीन बियांणे का महाग करत आहे, याबाबत शेतकऱ्यांना नक्कीच प्रश्न पडला असणार आहे. 

गेल्या वर्षी हंगामात अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनच मोठ्या प्रमाणात नुकसान केल आहे. 

या उन्हाळी हंगामात पाण्याची टंचाई किंवा उष्णतेमुळे शेतकऱ्यांनकडून अपेक्षित उत्पादन झाले नाही यामुळे झालेल्या उत्पादनातून अपेक्षित कच्चे बियांणे मिळू शकले नाही.

ज्या प्रकारे भारतात महागाई वाढत आहे, त्याच प्रकारे सोयाबीन बियांण्यावर होणाऱ्या पक्रियाचा खर्च सुध्दा वाढत आहे. 

असे इत्यादी कारणे असू शकतात ज्यामुळे सोयाबीन ( soybean seeds rate 2022 ) बियांणे महाग झाली असू शकतात.


महाबीज कंपनी मध्ये कोणाचा किती हिस्सा ?

शेतकऱ्यांना योग्य वेळी सोयाबीन बियांण्‍याचा ( ‘soybean seeds rate 2022’ ) पुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकारने २८ एप्रिल १९४७ रोजी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ स्थापना केली आहे. ४६ वर्षापासून शेतकऱ्यांचा विश्वास या महाबीज कंपनीवर आहे. महाबीज कंपनीमध्ये ४ हिस्से पडतात.

महाबीज कंपनी मध्ये महाराष्ट्र सरकारचा हिस्सा जवळपास ४९ टक्के आहे. 
राष्ट्रीय बियाणे महामंडळाचा हिस्सा ३५.४४ टक्के आहे.
बिजोत्पादक आणि शेतकरी हिस्सा १२.७० टक्के आहे.
कृषी विद्यापीठाचा हिस्सा २.८६ टक्के आहे.

सोयाबीन बियाण्यांचे भाव अशा प्रकारे भाव वाढले  ? 

महाबीज कंपनीने ज्याप्रकारे सोयाबीन‍ बियांण्याचे ( “soybean seeds rate 2022” ) किमती वाढवल्या त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यासुध्दा सोयाबीन बियांण्याचे किंमती वाढवल्याशिवाय राहणार नाही.

यावर्षी १३५ किंवा १४५ रुपयांनी मिळणारे सोयाबीन बियांणे, मागील वर्षी ७५ रुपयांनी मिळत होते. तसेच सोयाबीन बियांण्याची ३० किलोची बॉग मागील वर्षी १७०० रुपायांची बॉग २३०० रुपये देउन शेतकऱ्यांना विकत घ्यावी लागली होती. तसेच यावर्षी २३०० रुपयांनी मिळणाऱ्या बॉगची किंमत ४००० पेक्षा जास्त  किंमत झाली आहे.

कधी खताचे किंमती वाढत आहे तर कधी बियांण्याच्या किंमती वाढत आहे. अशा प्रकारे हे पुढे भाव वाढत राहिले तर शेतकऱ्यांनी शेती करावी कि नाही अशा प्रश्न‍ निर्माण होत आहे. 

Leave a Comment