SSC HSC Exam Date 2022-2023 : दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार या संभाव्य तारखेला

SSC HSC Exam Date 2022-2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ( Maharashtra state board of secondary and Higher secondary education ) 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षाचे 2022-2023 ( SSC HSC Exam Date 2022-2023 ) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची बोर्डाची परीक्षा 2 मार्च तारखेला सुरु होणार आहे. तसेच बारावीच्या बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरु होणार आहे. वरील संपूर्ण माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओके यांनी जाहीर केली आहे.


SSC HSC Exam Date 2022-2023


कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ( SSC HSC Exam Date ) ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आल्या होत्या तसेच विद्यार्थांनचा अभ्यासक्रम कमी सुध्दा केला होता. मागील वर्षी 2022 मध्ये दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कोरोनामुळे जवळपास 25 टक्कांनी कमी केला तसेच याचा फायदा विद्यार्थांना झाला आहे. तसेच 2022-23 या शैक्षणिक वर्षी विद्यार्थाच्या शाळा 15 जून पासून नियमित पणे सुरु झाल्या होत्या. तसेच राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षाच्याबाबत www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर माहिती उपलब्ध करुन दिल्या आहेत. 


विद्यार्थांच्या मनावरील ताण कमी व्हावा यासाठी 2022-2023 वर्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात दहावी आणि बारावीचे परीक्षाचे ( SSC HSC Exam Date ) वेळापत्रक जाहीर करण्याचे उद्देश म्हणजे विद्यार्थांना आपल्या अभ्यासक्रमाचे नियोजन करता यावे यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.


परीक्षापूर्वी विद्यार्थांना कनिष्ठ‍ महाविद्यालयात आणि शाळातून तुम्हाला अंतिम वेळापत्रकाचे झेरॉस देण्यात येणार आहे. तसेच तोंडी किंवा इतर विषायाचे वेळापत्रक तुम्हाला कनिष्ठ महाविद्यालयात आणि शाळातून तसेच मंडळामार्फत तुम्हांला कळवण्यात येणार आहे, असे मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट सांगितले आहे.


दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक 2022-2023

तपशील : संभाव्य वेळापत्रक 

बारावीची लेखी परीक्षा = 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 

दहावी लेखी परीक्षा = 2 मार्च ते 25 मार्च 2023

Leave a Comment