Stock Market : शेअर बाजार नमस्कार मित्रांनो, आज आपण शेअर बाजारात गुंतवणूक केली असल्यास किंवा गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक किती धोक्याची आहे. हे आपण आज समजून घेणार आहे.
Stock market |
शेअर बाजार बदल तुम्हाला काही माहिती नसेल तर हा लेख संपूर्ण वाचा कारण यामध्ये तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगणार आहे.
जगातील घडामोडींचा परिणाम शेअर बाजार वर होत असतो. त्या मध्ये आपणास चढ उतार पण पाहणास मिळतात. या बद्दल नेहमी चर्चा केली जाते. (Share market)
आपण स्टाॅक मार्केट मध्ये किती गुंतवणूक करायला पाहिजे? तसेच त्यासाठी काय केले पाहिजे. एवढेच नव्हे तर गुंतवणूक केलेले पैसे बुडायचा धोका असतो का? सेंसेक्स आणि निफ्टी म्हणजे काय असते? गुंतवणूक सुरक्षित असते का? असे प्रश्न निर्माण होतात तर हेच आज संपूर्ण जाणून घेऊया.
शेअर बाजार बदल जाणून घ्या
मुंबईतल्या एका वडाच्या झाडा खाली एकत्र येऊन व्यापारी लोकांनी सुरूवात केली होती. आणि येथेच शेअर मार्केटचा जन्म झाला असे म्हणतात.
भारतामध्ये या दोन शेअर बाजारामध्ये Trending होत.
1) बाँम्बे स्टाॅक एक्स्चेंज – BSE
2) नॅशनल स्टाॅक एक्स्चेंज – NSE
या शिवाय भारतात चालू स्थितीत 17 शेअर बाजार आहेत. मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक अंक म्हणजे Index नाव सेंसेक्स आहे.
मुंबई शेअर बाजार – Sensex
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक अंक निफ्टी 50 असे नाव आहे.
राष्ट्रीय शेअर बाजार – Nifty 50
शेअर खरेदी विक्री वेळ ‘Shear market today time’
सोमवार ते शुक्रवार
9:15 AM ते 3:30 PM
या वेळेतच खरेदी विक्री Trending होते.
शेअर बाजारात गुंतवणूक करण म्हणजे काही कंपन्याचे शेअर विकत घेणे आणि विकत घेतलेल्या शेअरचे भाव वाढले तर ते विकणे. यातून तुम्हाला काही नफा भेटतो. पण जर शेअरचे भाव घसरले तर तुम्हाला याचा फटका पण बसू शकतो. म्हणजेच तुमचा तोटा होतो.
शेअर विकत घेण्यासाठी काय करायचे
त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे डीमॅट अकाऊंट, ट्रेडिंग अकाऊंट, तसेच बॅक अकाऊंट पण असायला पाहिजे. चला तर हे आधी सोप्या भाषेत समजून घ्या.
1) डीमॅट अकाऊंट मध्ये डिजिटल रुपांतील शेअर नोंदवले जातात.
2) ट्रेडिंग अकाऊंट मध्ये शेअरची खरेदी विक्रीसाठी वापरले जाते.
3) बॅक अकाऊंट पैशाच्या व्यावहारीक गोष्टीसाठी लागते.
शेअर खरेदी विक्री साठी काही प्रकार आहेत.
हे समजून घेऊ.
ट्रेडिंग शेअर – शेअर विकत घेणे आणि भाव वाढल्यानंतर विकून टाकणे.
गुंतवणूक – लाॅग टर्म इन्व्हेस्टमेंट ( शेअर विकायची घाई करायची नसते)
या मध्ये शेअर विकत घेतात तर दोन वर्षां किंवा काही वर्षांसाठी शेअर तुमच्या जवळ ठेवण्याची तयारी असायला पाहिजे.
कोणते शेअर विकत घेतले पाहिजे
सर्वात आधी कंपनीचे आतापर्यंतचे काम पाहिले पाहिजे.
सेबीने दिलेल रेटिंग सुध्दा पहा. Start shear market
तज्ज्ञांनी टेक्निकल आणि फंडामेंटल चार्टच्या आधारे विश्लेषण केलेले पाहिले पाहिजे तसेच त्याचा अभ्यास पण करा.
कंपनीचे उत्पादन आणि त्याची मागणी किती आहे तसेच आधीच्या वर्षातील ताळेबंद सुध्दा पहा.
तुम्ही शेअर विकत घेताना किती कालावधीसाठी शेअर घेतला आणि त्यासाठी आपली तयारी आहे का? याचा विचार आपण केला पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कंपनी कधी बातम्यांमध्ये कधी चर्चाचा विषय होता का? बातम्यांमध्ये कंपनी असल्यास त्याचे कारण तपासले पाहिजे.
एकाच कंपन्यामध्ये मोठी गुंतवणूक करू नका कारण जर त्या क्षेत्रात मोठी घडामोडी झाली तर सर्वच कंपन्या वर याचा परिणाम पाहीला मिळतो.
शेअर बाजारात सगळीच गुंतवणूक केली नाही पाहिजे. त्यात वेगवेगळे पर्याय आहे. त्यामध्ये विभागून गुंतवणूक केली पाहिजे.
तज्ज्ञांचा सल्ला घेतला पण पाहिजे. टिप्सवर सगळाच विश्वास ठेवू नका. ब्रोकर्सची पण मदत घेऊ शकता.
शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित असेल का?
प्रत्येक गुंतवणूक मध्ये काही प्रमाणात जोखीम असते. तसेच शेअर बाजारात पण आहे. महत्त्वाचे म्हणजे शेअर बाजारात सगळ्या कंपन्यांवर आणि व्यवहार वर SEBI ची नजर असते. SEBI काय करते हे पण समजून घ्या. “Share market in India”
एकदा शेअर बाजारात एका दिवसात 5℅ टक्क्यांनी खाली व वर गेला तर SEBI त्या शेअरचे खरेदी विक्री तत्काळ थांबवले जाते. यालाच सर्किट म्हटले जाते. आणि सगळे व्यवहार तपासल्या नंतर पुन्हा सुरू केले जाते. असे का करतात तर गुंतवणूक दाराचे पैसे सुरक्षित राहवे. यासाठी असे केले जाते.
शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक करणार असल्यास तर संपूर्ण अभ्यास करा. त्यासाठी तयारी पण पाहिजे. तरच ह्या क्षेत्रात उतरा. ही माहिती आवडल्यास शेयर करा.