
Today Weather News : सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील कोकण भागात आणि घाट माथ्यावर आज 15 जुलै रोजी पावसाचा जोर हा कमी राहणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघर्गजनासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आजचा हवामान अंदाज | Today Weather News
तसेच हवामान खात्याने आज विदर्भ, मराठवाडात येलो अर्लट जारी केला आहे. हवामान खात्यानुसार आज मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, जालना, परभणी बहूतांश भागात आज पावसाचा अंदाज जारी केला आहे. विदर्भात गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, बुलडाणा, वाशीम, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताचा आपला बळीराजा WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
