Tur : तुरीची मागणी संपूर्ण भारतात होत आहे. सतत अतिवृष्टी होत असल्यामुळे तुर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. निसर्ग सात देत नसल्यामुळे रोगराईचा प्रादभार्व सुध्दा आपणास पाहयला मिळतो. आता सध्या नवीन तुरीला भाव ६५०० ते ७५०० पर्यंत मिळत आहे. जाणंकरांच्या मते यावर्षी तुरीचे उत्पादन कमी होणार असल्यामुळे तुरीला सर्वाधिक भाव मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे.
![]() |
Tur |
तुरीचे भाव वाढणार का ?
मागील वर्षी तुरीला ८००० पेक्षा जास्त भाव मिळाला आहे. याही वर्षी कापसा पेक्षा तूरीला सर्वाधिक भाव मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्टॉकिस्ट, मिलर्स, व्यापारी नवीन तूर येण्याआगोदरच खरेदीसाठी तयारी करत असल्याचे समोर येत आहे. केंद्र सरकार दोन वेळेस तूर उत्पादनचा अंदाज जारी केला होता. पहिला अंदाज ४३ लाख टन उत्पादन, दुसरा अंदाज ३८ लाख टन उत्पादनचा अंदाज सांगितला आहे. मागील वर्षी पेक्षा यावर्षी तूरीच्या उत्पादनात मोठी घट पाहता केंद्र सरकार तूर आयत करण्याचा विचार करत असल्याच समोर येत आहे. जर केंद्र सरकारने उशीरा आयातीवर विचार केला तर तूरीला तूफान भाव मिळण्याची शक्यता आहे असे जाणंकरांच मत आहे.
आयग्रेन इंडियाच्या अंदाजनुसार भारतात तूरीचे उत्पादन ३५ लाख टन होऊ शकते. मागील वर्षी तूरीची आवक कमी होती त्यामुळे केंद्र सरकारने आयातीवर भर दिला होता. याही वर्षी तूरीची कमतरता असल्यामुळे केंद्र सरकारला आयतीवर भर द्यावे लागणार आहे. आताच्या परिस्थितीनुसार केंद्र सरकार आफ्रिका देशातून तूर आयात करत असल्याचे समोर येत आहे. म्यानमार आणि भारतात फेब्रुवारी महिन्यातच तूरीची आवक सुरु होते. केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या आगोदरच तूरीची आयात केली तर भारतातील बाजार समिती मध्ये तूरीच्या दरावर मोठा परिणाम होऊ शकतो असा अंदाज काही जाणंकार करतात. पण काही जाणंकराच्या मते काही देशात अतिवृष्टी झाल्याने तेथे सुध्दा तुर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तुरीची मागणी असणार तसेच दरात सुध्दा सुधारणा पाहयला मिळणार.
केंद्र सरकारने किती तूर आयात केली तरी सुध्दा तुरीच्या भावात काही दिवसच चढ उतार पाहयला मिळणार आहे.