Tur Rate : दर वर्षी तामिळनाडू कर्नाटक तसेच महाराष्ट्रात तूरीचे पिक हे मोठ्या प्रमाणात घेतात. पण मागील वर्षी तूरीच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यावेळेस केंद्र सरकारने तूर आयात केली नव्हती तसेच इतर राज्यातून आणि कंपन्याकडून मोठी मागणी होती त्यामुळे तूरीचे भाव हे वाढले होते.
Tur Rate |
तूरीचे भाव वाढणार का ? ( Tur Rate )
महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात सुध्दा तूरीचे दर घसरत आहे. सध्या बाजार समिती मध्ये तूरीची आवक प्रमाणात येत आहे पण पुढे चालून तूरीची आवक कमी होण्याची शक्यता आहे.
मागील वर्षापासून देशात तूरीचे उत्पादनात घट होत असल्यामुळे केंद्र सरकारने बाहेर देशातून तूर आयात करत आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार केंद्र सरकार यावर्षी १० लाख टन तूर आयात करणार किंवा यापेक्षा जास्त हि आकडा मोठा असू शकतो. काही जांणकरांच्या मते सात लाख टन किंवा ८ लाख टन तूर आयात करु शकतात.
सध्या केंद्र सरकार आफ्रिकेतून तूर आयात करत आहे तसेच पुढे चालून म्यानमार देशातून सुध्दा तूर आयात करु शकतात. पण जांणकरांच्या मते, तूरीचे उत्पादन अनेक राज्यात घटलेले आहे. त्यामुळे देशात तूरीचे भाव हे घसरण्याची शक्यता कमी आहे.
महाराष्ट्रात अनेक राज्यात २०० ते ३०० रुपायांनी चढ उतार बाजार समिती मध्ये पाहयला मिळत आहे. महाराष्ट्रात सरासरी तूरीला भाव ६ हजार ३०० ते ७ हजार ५५० प्रति क्विंटल मिळत आहे. देशात तूरीचे उत्पादन कमी असल्यामुळे तूरीचे दर सध्या स्थिर राहण्याची शक्यता आहे.